Ad will apear here
Next
पुष्पा भावे : परखड समीक्षक, निडर सामाजिक कार्यकर्त्या (भाषणांचे व्हिडिओ)
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आज (तीन ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा हा अल्प परिचय..
.......
२६ मार्च १९३९ रोजी जन्मलेल्या पुष्पा भावे (पूर्वाश्रमीच्या पुष्पा सरकार) या विचारवंत लेखिका आणि प्रभावी वक्त्या. मराठी नाट्यसृष्टीचाही त्यांचा उत्तम अभ्यास होता आणि त्यांनी त्या संदर्भात पुष्कळ लेखन केलं आहे. त्यांची नाट्यविषयक समीक्षणं प्रसिद्ध आहेत.

मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या त्या मार्गदर्शन होत्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यातही त्यांचं मोठं योगदान आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर त्यांची ठोस भूमिका होती. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जनता पक्षाचं कामही केलं होतं. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार आणि अनंत भालेराव स्मृती पुरस्कार मिळाला होता. 

गुड मुस्लिम बॅड मुस्लिम, आम्हाला भेटलेले श्रीराम लागू, जहन्नम, रंग नाटकाचे अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

तीन ऑक्टोबर २०२० रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता मुंबईत त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

(प्रा. पुष्पा भावे यांच्या काही भाषणांचे व्हिडिओ खाली दिले आहेत.)

(पुष्पा भावे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WWSMCR
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ५) ‘आपल्या प्राचीन परंपरेत विज्ञान होतं आणि ते घराघरापर्यंत गेलेलं होतं. घराशी विद्यापीठ जोडलेलं होतं. आता विद्यापीठात जाऊन शिकावं लागतं. मग लक्षात आलं, की इथे आपण ‘मेकॉले’ घेऊन चाललोय. आपण हे शिक्षण देणार आणि जाणार, त्याच्याऐवजी त्यांच्याकडे जे ज्ञानाचं भांडार आहे, त्याच्यात आपण आधुनिकतेची भर घालावी आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language